महाराष्ट्रात म्हणे १२ मैलावर भाषा बदलते, पण इथल्या घराघरात एक गोष्ट कॉमन दिसते ती म्हणजे प्रवीण मसाले (pravin masale) आणि हा प्रसिद्ध ब्रँड तयार केला हुकमीचंद चोरडिया (hukmichand chordiya). त्यांच आज पुण्यात वयाच्या ९२ वर्षी वृध्दापकाळाने निधन झालं. हुकमीचंद चोरडिया यांना सगळेच भाऊ म्ह्णूनच हाक मारायचे. मारवाडी समाजातल्या एका सर्वसामान्य कुटुंबातून असलेले भाऊ. कुटुंब मोठ होत, पण उत्पन्न कमी, म्ह्णून भाऊंनी हेल्पर म्हणून काम करायला सुरुवात केली. हडपसरला मुंदडा कंपनीत त्यांना ६० रुपये महिना पगार होता.<br /><br /><br />
